शरद पवार गट दिंडोरीतून तर ठाकरे सेना नाशिकमधून लढणार; शांतीगिरी महाराज मविआचे नाशिकमधील उमेदवार ?

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच शरद पवार यांनी वरील घोषणा केली
शरद पवार गट दिंडोरीतून तर ठाकरे सेना नाशिकमधून लढणार; शांतीगिरी महाराज मविआचे नाशिकमधील उमेदवार ?

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते शरद पवार यांनी बुधवारी दिंडोरी मतदारसंघातून आपल्या पक्षाचा तर नाशिकमधून शिवसेनेचा (उबाठा) उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असेल, असे जाहीर केले.

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच शरद पवार यांनी वरील घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीला वेळ कमी असल्याने आणि जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. जागावाटप जवळपास निश्चित झाले असून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

शांतीगिरी महाराज मविआचे नाशिकमधील उमेदवार ?

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी करीत असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून महायुतीच्या उमेदवाराची घोषणा केल्याने जिल्ह्यातील राजकारणाला निराळे वळण लागले आहे. खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे असतील असे जाहीर केल्याने नाराज झालेले शांतीगिरी महाराज थेट महाविकास आघाडीच्या वळचणीला गेले आहेत. शांतीगिरी महाराज नाशिकमधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असतील असे महाराजांचे भक्तगण बोलू लागले असून त्यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चा केल्याचेही समजते. नाशिकसह छ.संभाजीनगर येथेही शांतीगिरी महाराजांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणावर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in