मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू झालेल्या पक्षाच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याने शरद पवार गटाने विलीनीकरणाच्या विषयाला आता पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी यासंदर्भात प्रतिनिधींशी प्रसारमाध्यमांच्या बोलताना आता विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून बंद करण्यात येत असल्याचे सांगितले.
२८ जानेवारीला अजित पवार विमानाला बारामतीत यांचा अपघात झाला. या अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार गटाकडून विलीनीकरणाचा विषय मांडण्यात आला. यावर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. शिवाय भाजपनेही या विषयात रस घेतला. विलीनीकरणाची चर्चा करताना भाजपला विश्वासात घ्यावे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यामुळे विलीनीकरणाला खंड पडला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, विलीनीकरणाच्या चर्चेवर आम्ही भावना व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीनीकरणाचे सूत्र कसे असेल याबाबत चर्चेत ठरवले जाणार होते. मात्र, चर्चा करणारा नेताच राहिलेला नाही. त्यामुळे आता यावर आम्हाला काहीच भाष्य करायचे नाही.
अजितदादा एकत्रिकरणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र, आता आम्ही हा विषय बंद केला आहे. कारण आम्हीच विलीनीकरणाच्या मागे लागलो आहोत, असे चित्र निर्माण केले जात आहे. आमच्याकडून यासाठी गडबड करण्यात आलेली नाही. आम्ही फक्त सत्य आणि शपथपूर्वक बोललो. दादांची जी इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र, आता यावर बोलायचे नाही हे आम्ही ठरवले आहे, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. असताना दोन्ही पक्षांच्या
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा या विलीनीकरणाला विरोध आहे का? या प्रश्नावर शिंदे यांनी थेट बोलण्याचे टाळले. याबाबतीत मी काही बोलणार नाही. कारण त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. आता आम्ही पुन्हा जोमाने काम करून आमचा पक्ष उभा करण्याची भूमिका घेतली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.