संभाजी भिडेंबद्दलच्या प्रश्नावर शरद पवार संतापले!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांना पुण्यातील पत्रकारांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंबद्दल प्रश्न विचारताच पवारांनी संतापून पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली.
संभाजी भिडेंबद्दलच्या प्रश्नावर शरद पवार संतापले!
ANI
Published on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांना पुण्यातील पत्रकारांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंबद्दल प्रश्न विचारताच पवारांनी संतापून पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली. 'संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारायचे का? संभाजी भिडे आणि अमुक-तमुक..' अशा शब्दांत संतापून शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असताना ओबीसी समाजाकडून जरांगेंच्या मागणीला तीव्र विरोध केला जात आहे. दोन्ही समाजातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना देखील थेट आव्हान दिले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. असे असताना संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडताना आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना सुनावले होते. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, शरद पवार यांनी संतप्त होत संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि पत्रकारांनाच झापले.

‘अजित पवारांच्या मनातले मला माहीत नाही’

दरम्यान, बारामतीमधून निवडणूक न लढवण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांना अनुकूल वातावरण असेल तिथून ते लढतील. त्यांच्या मनात नक्की काय आहे हे मला माहीत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in