
सध्या राज्याच्या राजकारणात नवनवीन घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह शिंदे सरकारमध्ये सामील होतं. मंत्रीपदाची शपथ घेतली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आठ जणांना खाते वाटप देखील जाहीर केलं आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडल्यानंतर अचानकपणे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जात शरद पवारांची भेट घेतली होती.
दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या भेटीत अजित पवार गटाकडून शरद पवार यांनी पक्ष फुटू नये म्हणून एकसंध काम करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. तसंच या भेटीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पवार हेच आमचे दैवत असून त्यांचा आशिर्वाद घेतल्याचं अजित पवार गटाच्या मंत्र्यांकडून सांगण्यात आलं. तसंच अजित पवार गटाने दिलेल्या प्रस्तावर त्यावेळी शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं देखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. त्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेच्या युवक मेळाव्यात मात्र शरद पवारांनी भाजप सोबत जाणार नसल्याचं स्पष्ट करत अजित पवार गटाचा प्रस्ताव फेटाळला.
यानंतर आता दोन दिवसांनी अजित पवार गटाचे सर्व आमदार हे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे. आधी सर्व मंत्री आणि आता सर्व आमदारांची शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात सर्व आमदार हे वायबी चव्हाण सेंटर येथे दाखल झाले. त्यावेली झालेल्या शरद पवार यांच्याभेटीत सर्व आमदारांनी त्यांना पक्षात फुट पडू देऊ नये. असी विनंती केली. यावेळी शरद पवार यांनी उपस्थितीत आमदारांना आपापल्या भागात पेरण्याच झाल्या आहेत का? याबाबत विचारणा केली.
या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी आज देखील आम्ही शरद पवार यांना पक्ष फुटू देऊ नये, अशी विनंती केल्याचं सांगितलं.