Sharad pawar : "त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्पप्न हे स्रप्नच राहणार, ही काही घडणारी गोष्ट नाही.", शरद पवारांचा अजित पवारांना टोला

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करु असं विधान केलं होतं
Sharad pawar : "त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्पप्न हे स्रप्नच राहणार, ही काही घडणारी गोष्ट नाही.", शरद पवारांचा अजित पवारांना टोला

अजित पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विजाजमान व्हायची महत्वाकांक्षा आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. मात्र, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य करताना अक्षरश: हवाच काढून टाकली. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार असं त्यांनी म्हटलं आहे. अकोला येथे सहकार महर्षी अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमासाठी तसंच सहकार महामेळावा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करु असं विधान केलं होतं यावर शरद पवार यांना विचारलं असता आम्ही तीन पक्ष एकत्र राहणार आमचा हाच आग्रह असणार आहे. असं पवार म्हणारे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या सर्वांचं उद्या राज्य यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. आम्ही जनमानसात जो प्रतिसाद पाहतो आहोत. त्याचं जर मतांमध्ये परिवर्तीत झालं तर या तीन पक्षांचं राज्य येऊ शकतं. यात आणखी सहभागी होतीत. उद्या. शेतकरी कामगार पक्ष या सर्वांशी आम्ही बोलू, असं देखील पवार म्हणाले.

ही घडणारी गोष्ट नाही, अजित पवारांचं स्वप्न स्वप्नच राहणार

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या गळ्यात पहिला हार घालणारी मी असेन कारण बहिण म्हणून माझा त्यांचयावर हक्क आहे. असं विधान केलं होत. यावर शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "ठिक आहे. पण हे एक स्वप्न आहे. ही काही घडणारी गोष्ट नाही." यावरुन त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न हे स्पप्नच राहणार असं देखील पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in