शरद पवारांनी घेतली गौतम अदानींची भेट ; रोहित पवार म्हणाले...

शरद पवार गौतम अदानी यांच्या घरी असलेल्या खासगी कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.
शरद पवारांनी घेतली गौतम अदानींची भेट ; रोहित पवार म्हणाले...
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील घरी दाखल झाल्याचं वृत्त आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार गौतम अदानी यांच्या घरी असलेल्या खासगी कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. आता यावर आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आणि अदानी यांच्या भेटीवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली असेल तर त्यात वेगळं काय आहे. पवार साहेब अंबानी अदानींना भेटतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. या सगळ्यांना भेटल्यानंतर राज्याचा आणि देशाचा विकास कसा करता येईल यावर चर्चा होत असते. त्यानंतर आपण पॉलिसी करत असतो. सर्व घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी कधीही करता येत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना रोहित यांनी शिवसेना आमदार अपात्रता कारवाईबाबत देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, अपात्रतेच्या कारवाई बाबत सुप्रीम कोर्टाने जसं नियोजन केलं होतं. तसंच नियोजन आताही झालं पाहिजे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीन महिने काय केलं? हे अख्या महाराष्ट्राला सांगावं. स्वाभिमानी राज्याचे अध्यक्ष असताना आज त्यांना दिल्लीला जाऊन मार्गदर्शन घ्यावं लागतं. ही आश्चर्याची आणि दुर्दैवी गोष्ट असल्याचा टोलाही रोहित पवार यांनी नार्वेकर यांना लगावला.

logo
marathi.freepressjournal.in