शरद पवारांना आता केंद्राची ‘झेड प्लस’ सुरक्षा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना राज्याची ‘झेड प्लस’ सुरक्षा आहे. मात्र त्यांना केंद्राचीही ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.
शरद पवारांना आता केंद्राची ‘झेड प्लस’ सुरक्षा
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना राज्याची ‘झेड प्लस’ सुरक्षा आहे. मात्र त्यांना केंद्राचीही ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.

‘सीआरपीएफ’चे दहा जवान शरद पवारांसोबत असणार आहे. नुकतीच ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचे निश्चित करण्यात आले.

शरद पवारांच्या घरी अनेक बैठका आणि भेटीगाठी होत असतात. रोज अनेक नागरिक किंवा कामकाजासाठी नेतेमंडळी येत असतात. मात्र, बदलापूर प्रकरणानंतर सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. शरद पवार आगामी निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत.

शरद पवार काही महिन्यांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले होते. त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in