
सोलापूर : मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी ज्या गावात सर्वप्रथम आंदोलन झाले, त्या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार रविवारी भेट देणार आहेत. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच मारकडवाडीला भेट देणार आहेत. ग्रामस्थांनी येथे मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी पूर्ण तयारी केली होती, मात्र प्रशासनाने ही प्रक्रिया थांबविली होती. दरम्यान, माळशिरसचे आमदार आणि आंदोलनाचे नेते उत्तम जानकर यांचा शपथविधी रविवारी होणार होता, मात्र, अध्यक्षांची परवानगी घेऊन सोमवारी ते अध्यक्षांच्या दालनामध्ये शपथ घेणार आहेत.