अजित पवार मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी दिले एका वाक्यात उत्तर; म्हणाले...

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आपले मत
अजित पवार मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी दिले एका वाक्यात उत्तर; म्हणाले...

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चर्चा सुरु आहे. त्यातील एक चर्चा म्हणजे अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच, त्यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर झळकल्यानंतर आता हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला. यावरून त्यांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, "भावी मुख्यमंत्र्याच्या पोस्टरवरून अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे की असा वेडेपणा करू नका." असे उत्तर दिले.

महाविक आघाडीकडून पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल, अशीदेखील चर्चा सुरु होती. यावर शरद पवार म्हणाले की, "अशी कोणतीही चर्चा उद्धव ठाकरेंसोबत झालेली नाही." असे स्पष्ट केले. तसेच, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु आहेत,' असे सूचक विधान केले होते. यावर शरद पवार म्हणाले की, "मला यासंदर्भात काहीही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलाचा निकाल आम्हाला सांगायचे कोणाला कारण नाही. असे काही सुरु आहे, असे माझ्या कानावरही नाही. हे राऊतांचे विधान असले तरी ते पत्रकार आहेत, ते तुम्हा पत्रकार लोकांना अधिक माहिती."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in