विलीनीकरणावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार काय? शरद पवारांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याबाबतची प्राथमिक चर्चा ही पूर्णतः अंतर्गत होती. ही चर्चा केवळ दिवंगत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातच सुरू होती. या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता, मग त्यांना या विषयावर भाष्य करण्याचा अधिकार काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला.
विलीनीकरणावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार काय? शरद पवारांचा सवाल
विलीनीकरणावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार काय? शरद पवारांचा सवाल
Published on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याबाबतची प्राथमिक चर्चा ही पूर्णतः अंतर्गत होती. ही चर्चा केवळ दिवंगत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातच सुरू होती. या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता, मग त्यांना या विषयावर भाष्य करण्याचा अधिकार काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला.

विलीनीकरणाची तारीख १२ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, मात्र या अपघातामुळे ती प्रक्रिया थांबली असल्याचे संकेतही त्यांनी दिले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल शरद पवार यांनी आपल्याला या निवडीचा आनंद असल्याचे बुधवारी बारामती येथील पत्रकार परिषदेत नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, या दुःखाच्या सावटातही आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बारामती विमानतळावर धावपट्टीजवळ झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा अंत झाला. या घटनेनंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुनेत्रा पवारांच्या या निवडीवर शरद पवारांनी समाधान व्यक्त केले असले, तरी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

अजित पवारांचा अपघात आणि स्मारक चर्चा

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावर पवार म्हणाले की, “जोपर्यंत अधिकृत माहिती समोर येत नाही, तोपर्यंत संशय व्यक्त करणे योग्य नाही. तसेच, बारामतीमध्ये अजित पवारांच्या स्मारकाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ज्या संस्थेच्या जागेवर स्मारक करण्याची चर्चा आहे, त्या संस्थेचा अध्यक्ष मी स्वतः आहे आणि अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही.”

भारत-अमेरिका कृषी कराराबाबत चिंता

शरद पवार यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारत-अमेरिका कृषी कराराबाबतही मोठी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतात सवलत मिळाल्यास भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in