Sharad pawar : शरद पवारांचं महिलांना आवाहन ; म्हणाले, "अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरा, सरकारने केसेस टाकल्या तर..."

या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती होती.
Sharad pawar : शरद पवारांचं महिलांना आवाहन ; म्हणाले, "अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरा, सरकारने केसेस टाकल्या तर..."
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. "समाजात काही चुकीचं दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकले, पर तरीही घाबरु नका. सरकार बदलत असतं. आपण त्या केसेस मागे घेतो", असं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या महिला मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी महिलांना महत्वाचं आवाहन केलं. ते म्हणाले की, अनेक तास बसून कोणी बाहेर गेलं नाही. सर्वांनी संघटनात्मक कामाबाबतची भूमिका मांडली आणि ती ऐकूण देखील घेतली. आपल्याला काही कार्यक्रम हाती घ्यायचे आहेत. यात महिला आरक्षण, महागाई असे मुद्दे आहेत. आपण महिला आरक्षणाचा निर्णय घेतला होता. आरक्षण निर्णयामुळे स्पष्ट झालं की महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत.

पवार पुढे म्हणाले की, आपण संरक्षण क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र, मी स्वत: मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. ही जमेची बाजू एका बाजूला परिस्थितीत आहे. दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळे आपल्याला जागरुक राहावं लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठं घडला तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हव्या. काय होईल तर ते केस टाकतील. विविध कलमे लावतील. तुम्ही चिंता करुन नका, सरकार बदलत असतं आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो. असं आवाहन शरद पवार यांनी महिला मेळाव्याला उपस्थिती महिला पदाधिकाऱ्यांना केलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in