शरद पवारांनी अजूनही ‘झेड प्लस’ सुरक्षा स्वीकारली नाही

केंद्रातील भाजप सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था देऊनही त्यांनी ती अद्याप स्वीकारलेली नाही.
शरद पवार
शरद पवार
Published on

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था देऊनही त्यांनी ती अद्याप स्वीकारलेली नाही. ते येत्या दोन दिवसात केंद्रीय राखीव पोलीस दलासोबत यासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे.

सध्या पवार व्यस्त असल्याने ही सुरक्षा का पुरवली जात आहे याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली नाही, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले.

माझ्याबाबत योग्य ती माहिती सरकारला मिळावी या उद्देशाने सुरक्षा व्यवस्था वाढवली, असा टोला पवार यांनी मारला होता.

logo
marathi.freepressjournal.in