Sharad pawar : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील आरोप प्रत्यारोप थांबता थांबेना ; भुजबळांच्या दाव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकर, म्हणाले...

भुजबळांनी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबतही त्यांनी दावे केले होते.
Sharad pawar : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील आरोप प्रत्यारोप थांबता थांबेना ; भुजबळांच्या दाव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकर, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले आहेत. सध्या या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पक्षात आधी घडलेल्या घडामोडींवरुन दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तसंच वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. अजित पवार गटाचे आमदार व सराकरमधील मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी संध्याकाळी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये २०१९ साली अजित पवारांच्या शपथविधीवेळी घडलेल्या घडामोडींबाबत अनेक दावे केले. यावेळी भुजबळांनी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबतही त्यांनी दावे केले. त्यावर आता खुद्द शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

छगन भुजबळ यांचा दावा

मंत्री छगन भुजबळ यांनी या मुलाखतीत शरद पवारांनी राजीमाना द्यायचा हे १५ दिवस आधीच ठरलं होतं. असा दावा केला. ते म्हणाले की,"प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांना शरद पवार राजीनामा देणार याची माहिती असणार मात्र मला त्याची काही माहिती नव्हती. त्यामुळे शरद पवार यांचा राजीनामा माझ्यासाठी धक्का होता. सुरुवातीला काही चर्चा झाल्या होत्या. पण नंतर १५ दिवस त्यांच्या घरात चर्चा झाली आणि असं ठरलं आहे हे मलाही माहित नव्हतं. मग मी सुप्रीया सुळेंना विचारलं, आम्हाला याबाबत काही माहित नाही. त्यावेळी त्या म्हणाल्या अजित पवारांना सगळं माहित होतं.", असं भुजबळ यांनी सांगितलं.

भुजबळांच्या दाव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अकोला दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी पत्रकार परिषदेत राजकीय मुद्यावर उत्तर दिलं. यावेळी पवारांना भुजबळांनी केलेल्या दाव्याविषयी विचारणा केली गेली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले की, "सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं हा प्रस्ताव छगन भुजबळांचा होता. पण त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यांचं कारण त्यांच्यानंतर पुढचं जे पाऊल होतं ते आम्हाला कुणाला मंजूर नव्हतं, असं शरद पवार म्हणाले."

पवार पुढे म्हणाले की, "आमची भाजपसोबत जायची संमती नव्हती. भुजबळांनीही कालच्या त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की भाजपाबरोबर जायचं नाही. अशी भूमिका होती. तसंच तुम्ही आहात तिथे मी आहे. हे सांगून ते तिकडे गेले..आता त्यांनी कबूल केलं की ते खोटं बोलले". असा टोला देखील शरद पवार यांनी भुजबळांना लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in