शरद पवार यांचे हेलिकॉप्टर दोन वेळा खाली आले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे चिपळूणमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमावरून परत जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर दोन वेळा उडता उडता पुन्हा खाली आले.
शरद पवार
शरद पवारसंग्रहित छायाचित्र
Published on

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे चिपळूणमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमावरून परत जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर दोन वेळा उडता उडता पुन्हा खाली आले.

५ ते ९ जानेवारीदरम्यान चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण नगरपालिकेच्या सावरकर मैदानात ३ दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात विविध क्षेत्रातील नामांकित उत्पादकांचे, कारखान्यांचे १०० स्टॉल्स सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. याच उद्घाटन समारंभाला पवार चिपळूणमध्ये आले होते.

कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार चिपळूणहून जायला निघाले. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर दोन वेळा उडता उडता पुन्हा खाली आले. ओव्हरलोडमुळे हेलिकॉप्टर व्यवस्थित ‘टेक ऑफ’ झाले नसावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in