शरद पवार यांची ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली ; म्हणाले, "अखेर हा..."

ना. धो. महानोर यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.
शरद पवार यांची ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली ; म्हणाले, "अखेर हा..."

प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांनी आज पुणे येथे रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने आजारी राहत होते. त्यांना हृदयाचा त्रास जानवत असल्याने २० दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ना. धो. महानोर यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. कवी ना. धो महानोर आणि शरद पवार यांच्यात घनिष्ट संबंध होते.

शरद पवारांचं भावनिक ट्विट

"माझे खूप जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचे रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला फार दु:ख झाले.ना. धो. महानोर यांच्या निधनाची बातमी समजतात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यमधील पळसखेड या खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धो. चे बालपण कष्टात गेले. पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना. धो. च्या कवितांना रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपतील गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारुड केलं. ना. धो. मनोहर यांची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेतात. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. यांचं निधन देखील पावसाळ्याच्या दिवसात व्हावं हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबातर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.", असं पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

ही आमच्यासाठी व्यक्तीगत हानी - सुप्रिया सुळे

त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कवी ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट केले की, "ज्येष्ठ कवी ना. धो. महानोहर यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी व्यक्तीगत हानी आहे. महानोरांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात बहिणाबाई आणि बालकवी यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवला. कवितेतून शेती, माती आणि संस्कृतीची नवी ओळख करुन दिली. त्यांच्या 'तिची कहाणी', 'रानातल्या कविता' 'पानझड', आदी अनेक रचना अजरामर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. त्यांच्या निधनामुळे आज साहित्याला मातीशी जोडून ठेवणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला. या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण महानोर कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली." असं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in