आजोबा मनोहर जोशी यांच्या अंत्ययात्रेत शर्वरी वाघला अश्रू अनावर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अंत्ययात्रेत त्यांची नात आणि अभिनेत्री शर्वरी वाघ हिला अश्रू अनावर
आजोबा मनोहर जोशी यांच्या अंत्ययात्रेत शर्वरी वाघला अश्रू अनावर
आजोबा मनोहर जोशी यांच्या अंत्ययात्रेत शर्वरी वाघला अश्रू अनावरफोटो - विजय गोहिल

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अंत्ययात्रेत त्यांची नात आणि अभिनेत्री शर्वरी वाघ हिला अश्रू अनावर झाले. मध्यरात्री ३ वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान मनोहर जोशींनी अखेरचा श्वास घेतला.

जोशी यांच्या अंत्ययात्रेचे अनेक भावूक करणारे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यावेळी आजोबांचा निरोप घेताना शर्वरीलाही रडू कोसळले.

शर्वरीचे फोटो येथे पाहा:

कोण आहे शर्वरी वाघ? 

शर्वरीचा जन्म 14 जून 1996 रोजी मुंबईत झाला. मनोहर जोशींची मुलगी नम्रता वाघ आणि जावई शैलेश वाघ यांची ती मुलगी आहे. शैलेश वाघ मुंबईतील एक प्रसिद्ध बिल्डर आहेत. शर्वरीने अभिनय क्षेत्रात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून 2015 मध्ये सुरुवात केली होती. ‘प्यार का पंचनामा 2’ हा तिचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता. नंतर ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टीटू की स्विटी’ या चित्रपटासाठीही तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर, तिने ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. मग ती ‘सितारा के तारे’ या चित्रपटात दिसली. पण, त्यानंतरच्या 'द फरगॉटन आर्मी - आझादी की जंग' या वेब सीरिजने तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.

दरम्यान, शर्वरी लवकरच निखिल अडवाणीच्या वेदा या चित्रपटात झळकणार आहे. जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १२ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याशिवाय, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, शर्वरी वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समध्येही आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in