Shashikant Warishe Murder : पत्रकार वारिशे हत्येमागील खरे सूत्रधार शोधूनच काढणार - संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी जत्रेत जाहीर सभा घेऊन रिफायनरी विरोधकांना धमकावले, रिफायनरी करून दाखवू, कोण आडवे येते ते बघू, अशी भाषा वापरली गेली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी
Shashikant Warishe Murder : पत्रकार वारिशे हत्येमागील खरे सूत्रधार शोधूनच काढणार - संजय राऊत

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाबाबत पत्र लिहिले आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी बैठकीत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरही मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, पत्रकार शशिकांत वारिशे यांनी रिफायनरी सुरू करण्याच्या उद्देशाने भविष्यात विकण्यासाठी कवडीमोल भावाने जमीन खरेदी करणारे जमीनदार कोण आहेत? या संदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली होती. रिफायनरी समर्थक, सरकारी पक्षातील काही उपस्थित लोक, रत्नागिरीतील काही राजकारणी, या प्रकरणात जमीन घेताना परप्रांतीयांशी संगनमत कसे केले जात आहे, राजापुरात नाणारच्या आसपास कोट्यवधी रुपयांचे जमिनीचे व्यवहार झाले याबाबत शशिकांत वारिशे यांनी त्याबद्दल बोलणे, लिहिणे सुरू केले होते. त्यामुळे त्या भागातील काही राजकारण्यांच्या ते हिटलिस्ट वर आले होते."

महाराष्ट्र उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी जत्रेत जाहीर सभा घेऊन रिफायनरी विरोधकांना धमकावले, रिफायनरी करून दाखवू, कोण आडवे येते ते बघू, अशी भाषा वापरली गेली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर बाब आहे. 24 तास अगोदर राज्याचे गृहमंत्री म्हणतात, रिफायनरी कोण अडवतंय ते बघू आणि दुसऱ्याच दिवशी रिफायनरी अडवणार्‍या तरुण पत्रकाराची हत्या.. याचा काय संबंध, हा योग समजावा की अजून काय? हे समजले पाहिजे?" असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in