तटकरे ही अजित पवारांची दुसरी पत्नी; शेकापच्या जयंत पाटील यांची वादग्रस्त टीका

विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच पार पडली. या निवडणुकीत शेकापच्या बाळाराम पाटील यांचा भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पराभव केला. हा पराभव शेकापच्या जिव्हारी लागला. या पराभवाचे विश्लेषण करत असताना, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षित मदत झाली नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
तटकरे ही अजित पवारांची दुसरी पत्नी; शेकापच्या जयंत पाटील यांची वादग्रस्त टीका

अलिबाग : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नुकतेच त्यांचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी रायगडमधून विद्यमान आमदार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला, त्यावेळी सुनील तटकरे ही अजित पवारांची दुसरी पत्नी असल्याची टीका शेकाप आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार तसेच माजी आमदार अनिल तटकरे, माजी आमदार पंडित पाटील हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. जयंत पाटील म्हणाले की, “सुनील तटकरेंना त्यांचे भाऊ अनिल तटकरे यांनी पुढे आणले. मात्र सुनील तटकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता आपल्याला सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीत उभे राहणार नाहीत, अशी स्थिती निर्माण करायची आहे. अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे.”

विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच पार पडली. या निवडणुकीत शेकापच्या बाळाराम पाटील यांचा भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पराभव केला. हा पराभव शेकापच्या जिव्हारी लागला. या पराभवाचे विश्लेषण करत असताना, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षित मदत झाली नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

“पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी न करता नव्या उमेदीनं कामाला लागा,” असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. “शेतकरी कामगार पक्ष हा दिलेला शब्द पाळणारा व कधीही न संपणारा आहे. मागील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये शेकापने अनेकांना निवडून आणले आहे. हा गरीबांची बांधिलकी जपणारा पक्ष आहे. याची जाणीव विरोधकांनी ठेवली पाहिजे. जिल्ह्यात शेकापची आजही पाच लाख मते आहेत. नेते सोडून गेले तरी मते कायम आहेत. त्यामुळे येत्या काळात पक्षाची ताकद आम्ही दाखवून देऊ,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in