शिखर बँक घोटाळा प्रकरण : क्लोजर रिपोर्टवर १ मार्चला सुनावणी

शिखर बँक घोटाळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जानेवारी अखेरीस मुंबई पोलिसांनी क्लीनचिट दिली.
शिखर बँक घोटाळा प्रकरण : क्लोजर रिपोर्टवर १ मार्चला सुनावणी

मुंबई : कोट्यवधींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फैसला १ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टची मार्च १ न्यायालयाने सुनावणी निश्चित केली आहे. सत्र न्यायालय क्लोजर रिपोर्ट स्वीकारणार की नाकारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला समाजसेवक अण्णा हजारे, शालिनीताई पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांना दिलासा मिळणार का? हे पुढील सुनावणीला स्पष्ट होईल.

शिखर बँक घोटाळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जानेवारी अखेरीस मुंबई पोलिसांनी क्लीनचिट दिली. काही महिन्यांपूर्वी घोटाळ्याचा नव्याने तपास करीत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले होते; मात्र अधिक तपासात काहीच सापडले नाही, असा निष्कर्ष काढून तपास यंत्रणेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला. हा रिपोर्ट शनिवारी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सादर होण्याची शक्यता होती; मात्र विशेष सरकारी वकील अजय मिसार हे सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १ मार्चपर्यंत तहकूब केली.

logo
marathi.freepressjournal.in