काय असणार आहे शिंदे सरकारची दिवाळी भेट ? राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

हा संच एक महिन्याच्या कालावधीसाठी देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल
काय असणार आहे शिंदे सरकारची दिवाळी भेट ? राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला येत्या ८ ऑक्टोबर रोजी १०० दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील रेशनकार्डधारकांना केवळ १०० रुपयांत दिवाळीचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने महागाईने त्रस्त असलेल्या गरिबांना दिवाळीची भेट दिली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार प्रत्येक रेशनकार्डधारकांना प्रति एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर पामतेल मिळेल. राज्यातील एक कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीसाठी देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५१३ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

शिधा वस्तूंचा हा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा. त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये, याची खबरदारी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in