शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईत लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

संजय शिरसाट यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईत लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना आज सकाळी तातडीने एअर अ‌ॅम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात आले. संजय शिरसाठ यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले की, संजय शिरसाट यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात शिरसाट यांची तपासणी करण्यात आली. तपासणीतून संजय शिरसाट यांना यापूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. तसेच, शिरसाट यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांनी शिरसाट यांची अँजिओग्राफी केली.

आज सकाळी एअर अ‌ॅम्बुलन्सने त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले. मुंबईतील लिलावती रुग्णालयात संजय शिरसाट यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. तसेच, संजय शिरसाट यांची तब्येत आता बरी आहे. केवळ काळजी म्हणून त्यांना मुंबईला हलवण्यात आले, असेही सांगण्यात आले आहे.

संजय शिरसाट मुंबईला गेले. त्यांचे फोटो समोर आले आहेत. ते चालत विमानतळावरून बाहेर पडले. तसेच इतर ठिकाणीही वावरले. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचे समजते. तसेच सिग्माच्या डॉक्टरांनीही काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून शिरसाटांना पुढील उपचारासाठी त्यांनी मुंबईला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in