शिंदे गटाच्या 'या' खासदाराने केली 'आदिपुरुष' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रसून जोशी यांना याबाबतचे पत्र लिहून ही मागणी केली आहे.
शिंदे गटाच्या 'या' खासदाराने केली 'आदिपुरुष' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीपासून वादात सापडला आहे. हा वाद काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. या सिनेमातील संवादावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तसंच कथानकापासून तर वेषभूषा आणि संवादावरही अनेकांनी आक्षेप घेतला आहे. 'आदिपुरुष' हा सिनेमा इतिहास आणि तथ्यांना धरुन नसल्याची टीका अनेकांकडून केली जात आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना या विरोधात मैदानात उतरल्या असून नेपाळमध्ये तर यावरुन मोठा वादंग उठला आहे. काठमांडूत हा सिनेमा दाखवला जाणार नाही. दुसरीकडे भाजपच्या काही खासदारांनी या सिनेमाचं कौतूक केल आहे. असं असताना शिंदे गटाच्या एका खासराने मोठी मागणी केली आहे.

'आदिपुरुष' सिनेमावरुन वाद सुरु असताना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या सिनेमावक बंदी घालण्याची मागणी केली आहे. बारणे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रसून जोशी यांना याबाबतचे पत्र लिहून 'आदिपुरुष' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासिनेमामुळे भारताची बदनामी होत असल्याचे बारणे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. बारणे यांच्या मागणीमुळे सिनेनिर्मात्याची चांगलीच कोंडी झाली आहे. तसंच भाजपच्या काही खासदारांनी सिनेमाची कौतूक केल्याने शिंदे गटाच्या मागणीने भाजपची देखील कोंडी झाली आहे. भापचे खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी सिनेमाचं कौतुक करत हा सिनेमा आजच्या पिढीशी सुसंगत असल्याचं म्हटलं होतं.

या सिनेमाच्या विरोधात नालासोपारा येथे काही हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली होती. एका सिनेमागृहात तर हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने आणि घोषणाबाजी करत सिनेमा बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी प्रेक्षकांची धावपळ झाली होती. हा सिनेमा बंद पाडण्याचा प्रयत्न करताना. संघटनांच्या वतीने जय श्रीरामचे नारे देखील देण्यात आले होते. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in