देवपूर, खडपी, गांजवणे येथील शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

कोंढवी विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून हनुमंत जगताप व प्रमुखांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
देवपूर, खडपी, गांजवणे येथील शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

शैलेश पालकर / पोलादपूर : शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा नेते हनुमंत जगताप यांच्या उपस्थितीत देवपूर, खडपी आणि गांजवणे येथील शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याच्या बातमीने पोलादपूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रवेशकर्त्यांमध्ये दामोदर महाडिक, विजय मोरे, ज्ञानेश्वर पवार, बळीराम सिनकर, तुळशीराम पवार, कोंडीराम जाधव, विलास उतेकर, लक्ष्मण पवार, बाबुराव पवार, सीताराम जगदाळे, दिलीप जगदाळे, सौरभ पवार, गणेश जगदाळे, गजेंद्र चव्हाण, ज्ञानेश महाडिक, उत्तम जगदाळे, अविनाश जगदाळे, निलेश चव्हाण या प्रमुख कार्यकर्तेसह असंख्य ग्रामस्थांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला.

यावेळी कोंढवी विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून हनुमंत जगताप व प्रमुखांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील देवपूर, खडपी व गांजवणे भागातील राजकीय कार्यकर्ते प्रवाही असून या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात जोरदार खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in