
मुंबई : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या मंदिर नगरीत भीक मागण्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५१ जणांपैकी चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केला.
या मृत्यूंची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “शिर्डीत ५१ जणांना भीक मागत असल्याच्या आरोपावरून अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. त्यांची तब्येत बिघडल्याने काहींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला.” “या रुग्णांना अमानवी वागणुक दिल्याचे प्रकार समोर येत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.