शिर्डीचे साई मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी

अहिल्यानगर : शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी साई संस्थानला ईमेलद्वारे देण्यात आली आहे. साईबाबा मंदिर पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे साई संस्थानला देण्यात आली आहे. अजित जक्कुमोल्ला या नावाने हा मेल साई संस्थानाला पाठवण्यात आला असून याचा आयपी ॲड्रेस कर्नाटकमधील असल्याचे समजते.
शिर्डी साईबाबा
शिर्डी साईबाबाछायाचित्र सौ. - FPJ (Twitter)
Published on

अहिल्यानगर : शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी साई संस्थानला ईमेलद्वारे देण्यात आली आहे. साईबाबा मंदिर पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे साई संस्थानला देण्यात आली आहे. अजित जक्कुमोल्ला या नावाने हा मेल साई संस्थानाला पाठवण्यात आला असून याचा आयपी ॲॅड्रेस कर्नाटकमधील असल्याचे समजते.

धमकीचा ईमेल आल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली असून भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. साईबाबा संस्थानसह हजारो पोलिसांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला असून साईभक्तांनी कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी यावे, असे आवाहन साईमंदिर प्रशासनाने केले आहे.

या धमकीच्या मेलमध्ये प्रामुख्याने ‘फर्स्ट पहलगाम, नेक्स्ट शिर्डी’, असे लिहिले आहे. तसेच, तमिळनाडूमधील जफ्फार सादीक आणि जफ्फार सईद यांची गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी, असेही लिहिले आहे. दरम्यान, साई संस्थानाला आलेल्या या धमकीच्या मेलची पुष्टी संस्थान प्रशासनाकडून करण्यात आली असून याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३५१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in