१३ जुलैला शिवभक्त विशाळगडावर जमणारच! छत्रपती संभाजीराजे यांचे पत्रकार परिषदेत मत

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा. ही माझ्यासह सकल हिंदू समाजाची तसेच सर्व शिवभक्तांची इच्छा आहे. यावर सरकारने व प्रशासनाने तातडीने विचार करावा, असे स्पष्ट मत व्यक्त करत १३ जुलैला सर्व शिवभक्त विशाळगडवर जमणार, तेव्हा आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा रविवारी छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
१३ जुलैला शिवभक्त विशाळगडावर जमणारच! छत्रपती संभाजीराजे यांचे पत्रकार परिषदेत मत

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा. ही माझ्यासह सकल हिंदू समाजाची तसेच सर्व शिवभक्तांची इच्छा आहे. यावर सरकारने व प्रशासनाने तातडीने विचार करावा, असे स्पष्ट मत व्यक्त करत १३ जुलैला सर्व शिवभक्त विशाळगडवर जमणार, तेव्हा आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा रविवारी छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, पुरातत्व खात्याच्या अंतर्गत हा किल्ला असताना रायगडावर- राजगडावरचे एक दगड जरी हलवायचे म्हटले तरी हजार परवानग्या शिवभक्तांना घ्यायला लागतात, मग ही विशाळगड येथे अतिक्रमणे झाली कशी? ज्या ठिकाणी करवीरचे पहिले शिवाजीराजे यांचा राज्याभिषेक झाला, राज्याची राजधानी म्हणून ज्या विशाळगडाने ओळख निर्माण केली. असा हा विशाळगड आता अतिक्रमनाने वेढला आहे. इथे कत्तलखाना बनलाय, त्यामुळे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी देखील तुमच्या मनात जसा विशाळगड आहे तो बनवू असा विश्वास दिला होता. तो अजून पूर्ण झालेला नाही, परिणामी, सरकारच्या मनातली भूमिका काय हे स्पष्ट झाले पाहिजे. हे सरकार व प्रशासन अतिक्रमण हटवायला विलंब का करत आहे, शांत का आहे? असा परखड सवाल करत, ही अतिक्रमण न हटवल्यास १३ जुलैला विशाळगडावर जमायचच ही सर्व ही शिवभक्तांची इच्छा आहे. त्यामुळे सरकारनेच आता त्यांची भूमिका जाहीर करावी, असे स्पष्ट मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

सगळी अतिक्रमणे त्वरित पाडली जावीत अशी मागणी राज्यातून आलेल्या विविध हिंदुत्वच प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतृत्वाने व शिवभक्तांनी केले, यावेळी वेळप्रसंगी आम्ही मावळे गनिमीकावा वापरू व विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी टोकाची भूमिका घेऊ असा, इरादा स्पष्ट करत, शिवरायांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार परिषदेला इतिहास अभ्यासक वसंतराव मोरे, मंजुश्री पवार, संजय पवार, सुखदेवगिरी, पंडित पवार, फहत्तेसिंग सावंत आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभैय्या बेग यांनी यावेळी सरकारने गड, किल्ले संवर्धनासाठी समितीला दिलेल्या ८०० कोटी रुपयांच्या निधीतून काय कामे झाली याचा हिशेब द्यावा आणि त्या समितीकडून सर्वच गडांवरील अतिक्रमणांचा पाठपुरावा करावा अशी मागणी केली.

१५६ अनधिकृत अतिक्रमणे

शिवभक्तांची वतीने विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली आहे. विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी या निमित्ताने सरकारला करण्यात आली आहे. विशाळगड येथे झालेल्या महाआरतीनंतर बोलताना जगत‌्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले की किल्ल्यावर जवळजवळ १५६ अनधिकृत अतिक्रमणे आहेत. यात तीन मजली मशीद आहे तसेच मलिक रेहान दर्ग्याचे अतिक्रमण सुद्धा आहे, ते तत्काळ हटविले पाहिजे.

logo
marathi.freepressjournal.in