कराडमध्ये शिवजयंती उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराज की जय..,जय भवानी.., जय शिवाजी.. हर हर महादेव, येळकोट जय मल्हार, जय श्रीराम'जय घोषणांनी बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेली शिवजयंतीची दरबार मिरवणूक रात्री उशिरा अलोट गर्दीत पार पडली.
कराडमध्ये शिवजयंती उत्साहात
Published on

कराड : छत्रपती शिवाजी महाराज की जय..,जय भवानी.., जय शिवाजी.. हर हर महादेव, येळकोट जय मल्हार, जय श्रीराम'जय घोषणांनी बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेली शिवजयंतीची दरबार मिरवणूक रात्री उशिरा अलोट गर्दीत पार पडली. फटाक्यांची आतषबाजी, पारंपारिक वाद्यांचा निनादाने प्रफुल्लित वातावरणात बालचमूंसह शिवप्रेमी, युवक, युवती, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.द रबार मिरवणुकीत उपस्थित रोबोट हत्तीसह विविध चित्ररथाने मिरवणुकीची शोभा वाढवली.

येथील हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही या उत्सवाचे खास आकर्षण असलेल्या भव्य दरबार मिरवणुक बुधवारी पार पडली. गेली तीन दिवस शिवजयंती उत्सव राबवला गेला. सोमवारी शहरातील चावडी चौक येथे हिंदू एकता आंदोलनच्यावतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीतील प्रतिष्ठापना करून शिवजयंती उत्सवात प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी पारंपारिक शिवजयंतीनिमित्त कराड शहर, मलकापूर परिसरात ठिकठिकाणी शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच मलकापूरसह तालुक्यातील आणि गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

भव्य मूर्त्यां व रोबोट हत्तीने शोभा वाढली

छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती, रामभक्त हनुमान, श्रीरामाच्या भव्य मूर्तींनी मिरवणुकीची शोभा वाढवली. यंदा प्रथमच मिरवणुकीमध्ये हुबेहूब रोबोटचा हत्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. हा हत्ती कान व डोळे हलवत असल्याने यात जिवंतपणा दिसत होता. या मूर्ती व हत्ती पाहण्यासाठी बाह आबालवृद्धांमध्ये वेगळाच उत्साह जाणवला होता.

logo
marathi.freepressjournal.in