लाडकी बहीणनंतर शिवसेनेचे लाडकी सून अभियान; राज्य प्रमुखपदी मीनाक्षी शिंदे, महिलांच्या न्यायासाठी उभारणार सक्षम यंत्रणा

महायुती सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेनंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी शिवसेनेने 'लाडकी सून' या नव्या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाच्या महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी माजी महापौर तथा शिवसेना नेत्या मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्यभरातील कामकाजासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.
लाडकी बहीणनंतर शिवसेनेचे लाडकी सून अभियान; राज्य प्रमुखपदी मीनाक्षी शिंदे, महिलांच्या न्यायासाठी उभारणार सक्षम यंत्रणा
लाडकी बहीणनंतर शिवसेनेचे लाडकी सून अभियान; राज्य प्रमुखपदी मीनाक्षी शिंदे, महिलांच्या न्यायासाठी उभारणार सक्षम यंत्रणा
Published on

ठाणे : महायुती सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेनंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी शिवसेनेने 'लाडकी सून' या नव्या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाच्या महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी माजी महापौर तथा शिवसेना नेत्या मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्यभरातील कामकाजासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त या अभियानाची अधिकृत घोषणा करण्यात आली. सुनांवर होणारे अन्याय-अत्याचार, कौटुंबिक वाद, कायदेशीर अडचणी आणि विविध सामाजिक प्रश्नांमध्ये महिलांना मदत व न्याय मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

ठाण्यातील शिवसेनेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सूर्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मूलमंत्राची आठवण करून दिली. आपल्या समस्या घेऊन कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला येथे न्याय, आधार आणि समस्यांचे निराकरण मिळेल, असा विश्वास वाटला पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले. सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील कार्याची दखल घेत मिनाक्षी शिंदे यांच्यावर राज्य प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे 'लाडकी सून' अभियानाला नवी दिशा आणि व्यापक लोकसहभाग मिळेल. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समाजहितासाठी आणि संघटन बळकटीसाठी आपल्या नेतृत्वाखाली लाडकी सून अभियान उल्लेखनीय कार्य करेल, याची खात्री आहे.

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून 'लाडकी सून' अभियानावर काम सुरू असून, यापूर्वी त्या समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. आता राज्य प्रमुख म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील कामकाजाचे समन्वयन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ठाण्यातील 'सूर्या' कार्यालय हे अभियानाचे मुख्यालय असून, येथून लीगल टीम, कॉल सेंटर आणि इतर प्रशासकीय कामकाज चालवले जाते. राज्यभरातून येणाऱ्या तक्रारी, सूचना आणि विविध प्रश्नांची नोंद करून त्यांचे वर्गीकरण केले जाते. त्यानंतर संबंधित जिल्हा प्रमुख आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मिनाक्षी शिंदे, माजी महापौर

'आनंद आश्रम' येथे विशेष कार्यालय

प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहिती असते. त्यामुळे जिल्हा प्रमुख आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यावर भर दिला जात आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचार, कौटुंबिक समस्या आणि विविध सामाजिक प्रश्नांवर तत्काळ मार्गदर्शन व मदत मिळावी, यासाठी अभियान कार्यरत राहील," असे मिनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ठाण्यातील 'आनंद आश्रम' येथे या अभियानासाठी विशेष कार्यालय सुरू करण्यात आले असून, पीडित महिलांना कायदेशीर सल्ला, समुपदेशन आणि आवश्यक मदत पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in