...तर शिवतारेंशी आमचे संबंध तुटतील -संजय शिरसाट

बारामती मतदारसंघातून आपण उमेदवारी लढविणार असल्याचे विजय शिवतारे यांनी जाहीर केले आहे. बारामतीमधून महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. विजय शिवतारेदेखील शिवसेनेत म्हणजेच महायुतीत आहेत.
...तर शिवतारेंशी आमचे संबंध तुटतील -संजय शिरसाट

प्रतिनिधी/मुंबई

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत शिवसेना नेतृत्वाने दिले आहेत. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत विजय शिवतारे यांचे मन वळविण्याचा आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याशी ते चर्चा करतील. मात्र तरीदेखील त्यांनी जर अर्ज भरलाच तर त्यांच्यासोबत आमचे नात तुटलेले असेल. नेतृत्वाचे जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांचे आणि आमचे संबंध संपतील, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

बारामती मतदारसंघातून आपण उमेदवारी लढविणार असल्याचे विजय शिवतारे यांनी जाहीर केले आहे. बारामतीमधून महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. विजय शिवतारेदेखील शिवसेनेत म्हणजेच महायुतीत आहेत. ‘फाशी दिली तरी बेहत्तर, पण आपण निवडणूक लढविणारच’, असे शिवतारे म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरदेखील त्यांनी सातत्याने टीका केली आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा शिवतारे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. अर्ज भरेपर्यंत त्यांची समजूत घालण्यात येईल. पण जर एवढे समजावूनही शिवतारे यांनी उमेदवारी अर्ज भरलाच तर त्यांचे आणि आमचे नाते तुटलेले असेल. नेतृत्वाचे जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांचे आणि आमचे संबंध संपतील व तशी घोषणा आम्ही करू,” असे शिरसाट म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in