Shiv Sena MLA Disqualification Verdict LIVE: शिवसेनेचा महानिकाल; बघा थेट प्रक्षेपण

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण देशाचे लक्ष...
Shiv Sena MLA Disqualification Verdict LIVE: शिवसेनेचा महानिकाल; बघा थेट प्रक्षेपण

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला अवघी काही मिनिटे बाकी आहेत. या निकालाकडे राज्याचेच नाही तर अख्या देशाचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत काय निकाल देतात, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यामधील नेमकी कोणाची विकेट पडते हे थोड्याच वेळात समजणार आहे. नार्वेकरांनी निकाल वाचण्यास सुरूवात केली आहे. बघा लाईव्ह निकाल आणि वाचा आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे -

विधानसभा अध्यक्ष निकाल जाहीर करताना काय-काय म्हणाले?

  • खरी शिवसेना कोणती हा माझ्यासमोरील मुद्दा

  • घटना, नेतृत्व विधीमंडळ महत्त्वाचे घटक

  • प्रत्येकाला निकालाची प्रत देण्यात येईल

  • राजकीय पक्ष कोण प्रथमदर्शी ठरवणार

  • घटना, नेतृत्व आणि विधीमंडळातील बहुमत, पक्ष ठरवताना महत्वाचे

  • दोन्ही गटामध्ये पक्ष प्रमुखांवरुन मतमतांतर

  • विधीमंडळातील बहुमताचा मुद्दा महत्वाचा

  • दोन्ही बाजूंपैकी राजकीय पक्ष कोण हे आधी ठरवणार

  • दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत

  • उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेच्या प्रतवर तारीख नाही

  • 2018 ला पक्षाच्या घटनेत जी सुधारणा केली, ती चूक

  • मी दोन्ही गटाकडून घटनेची प्रत मागवली होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेच्या प्रतचा मी आधार घेत नाही

  • ठाकरे गट उलट तपासणीला आले नाहीत, त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य नाही

  • 2018 साली पक्षाची निवडणूक झालेली नाही

  • 1999 सालची घटनाच वैध, ठाकरेंनी दिलेली 2018 सालची घटना मान्य नाही

  • खरी शिवसेना कोण हे ठरवण्याचा अधिकार मलाच

  • पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येत नाही

  • एकनाथ शिंदेंना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही

  • राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो

  • उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारणीचा सपोर्ट नव्हता

  • पक्षप्रमुकांचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळला

  • मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

  • शिंदे गट हिच खरी शिवसेना, नार्वेकरांचा निकाल

  • गोगावलेंची नियुक्ती बरोबर, त्यांचाच व्हीप योग्य

  • भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता

  • शिंदेंच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही

  • दोन गट आक्षेप घेऊ शकतात मात्र, विधीमंडळ गट हाच खरा पक्ष

  • 16 आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळली

  • शिंदे गटाचे 16 आमदार पात्र

logo
marathi.freepressjournal.in