शिवसेना आमदार रवींद्र फाटकांसह, पालघर जिल्हाप्रमुख शहांची हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाया केल्याचे कारण देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या दोघांची हकालपट्टी करण्यात आली
शिवसेना आमदार रवींद्र फाटकांसह, पालघर जिल्हाप्रमुख शहांची हकालपट्टी

शिवसेनेने आता आपल्या बंडखोर नेत्यांविरोधात आक्रमकपणे कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर कठोर कारवाई केल्यानंतर शिवसेनेने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक व पालघर जिल्हाप्रमुख राजश शहांची पक्षातून हकालपट्टी केली.

पक्षविरोधी कारवाया केल्याचे कारण देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या दोघांची हकालपट्टी करण्यात आली आहे, असे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आले आहे. शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ठाण्यात आपला दबदबा रहावा, यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी सोमवारी खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यातून पक्षाचा संघटनात्मक आढावा घेत कोण शिवसेनेसोबत आहेत, कोण नाही याची चाचपणी त्यांनी केली. यानंतर पालघरमध्ये फाटक व शहा या दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in