छगन भुजबळांना अश्लील भाषेत शिवीगाळ; सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल

गायकवाड यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानानंतर कल्याण येथील दुर्गेश बागुल नामक व्यक्तीने गायकवाड यांना फोन करुन याबाबत विचारणा केली. यावर गायकवाड यांनी बागुल यांच्यासह...
छगन भुजबळांना अश्लील भाषेत शिवीगाळ; सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल

राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा नेते उभे ठाकताना दिसत आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेवरुन ओबीसी नेते आणि संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे राज्य सरकारच्या निर्णयाला उघड विरोध दर्शवत आहेत. यावर छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असतील तर त्यांच्या कमरेत लाथ घालून त्यांना सरकारमधून बाहेर काढा, असे वादग्रस्त व्यक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. असे असताना आता गायकवाड यांनी भुजबळ यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भुजबळांनी राज्य सराकारच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. गायकवाड यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानानंतर कल्याण येथील दुर्गेश बागुल नामक व्यक्तीने गायकवाड यांना फोन करुन याबाबत विचारणा केली. यावर गायकवाड यांनी बागुल यांच्यासह छगन भुजबळ यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशळ मीडियावर व्हायरल झाली आहे. असे असले तरी या क्लिप मागील सत्यता अद्याप समोर आलेली नाही. मात्र, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय आहे कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण?

दुर्गेश बागुल - हॅलो

आमदार गायकवाड - हॅलो..

दुर्गेश बागुल - आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना हा ?

गायकवाड - कोण बोलतंय?

दुर्गेश बागुल - दुर्गेश बागुल बोलतो...

गायकवाड - कुठून ?

दुर्गेश बागुल - कल्याण...

गायकवाड - हा बोला...

दुर्गेश बागुल - साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिले ते...

गायकवाड - दिलं ना** त्या भुजबळच्या... माज आला त्याला...त्याचं **** काय म्हणणे आहे तुह्यावाले...

दुर्गेश बागुल - साहेब हे तुम्ही चुकीचे बोलता...

आमदार गायकवाड - ****खानदान ही खतम करतो **** मी...

दुर्गेश बागुल - साहेब ऐका हो ऐका.... .आम्ही सुद्धा शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत...

तर डबल शिव्या द्या-

दरम्यान, संजय गायकवाड यांनी भुजबळांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय गायकवाड यांना अशी वक्तव्य करायला रोखले पाहिजे. अन्यथा त्यांचे पाय उखडून टाकायला कार्यकर्ते खंबीर आहेत. छगन भुजबळ हे कशाला पाहिजे? तुम्हाला जशास तसे उत्तर मिळेल. तू आमदार तुझ्या घरी, बोलताना नीट बोलले पाहिजे, असे पाटील म्हणाल्या. तसेच, मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिले पाहिजे. अन्यथा सत्तेतील कुस्ती लोकांना पाहायला मिळेल असे म्हणत जर संजय गायकवाड यांनी शिव्या दिल्या तर डबल शिव्या द्या”, असा सल्लाही पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

logo
marathi.freepressjournal.in