

नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या चिन्हांबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची ‘तारीख पे तारीख’ सुरूच असून पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतरच ही सुनावणी होणार आहे.
आता येत्या १८ फेब्रुवारीपासून याबाबत दैनंदिन सुनावणी सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात १८ फेब्रुवारीपासून अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सविस्तरपणे ऐकून घेतला जाणार असून, त्यानंतर या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणाचा निकाल आता फेब्रुवारी महिन्यात तरी लागणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.