शिवसेनेला किमान चार जागांची अपेक्षा शेकापसोबत जागावाटपाची चर्चा सुरू

आगामी अलिबाग नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या स्वरूपात लढवण्यास आम्ही इच्छुक आहोत. मात्र, जागावाटपात योग्य सन्मान न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असा इशारा शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिला. शिवसेनेने अलिबागमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
शिवसेनेला किमान चार जागांची अपेक्षा शेकापसोबत जागावाटपाची चर्चा सुरू
शिवसेनेला किमान चार जागांची अपेक्षा शेकापसोबत जागावाटपाची चर्चा सुरू
Published on

अलिबाग : आगामी अलिबाग नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या स्वरूपात लढवण्यास आम्ही इच्छुक आहोत. मात्र, जागावाटपात योग्य सन्मान न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असा इशारा शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिला. शिवसेनेने अलिबागमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सतीश पाटील व तनुजा पेरेकर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मित्रपक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. अलिबागमध्ये आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाल्याचे भोईर यांनी सांगितले. शहरातील ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे किंवा जिथे उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतात, अशा किमान तीन ते चार जागांवर आमचा दावा असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेकापकडून शिवसेना (ठाकरे गट) यांना समाधानकारक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर सर्वच जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय शिवसेना घेण्यास तयार असल्याचे प्रसाद भोईर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in