ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार ? अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक

कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून बाहेर आल्यानंतर पोळ यांना काही महिलांनी पुन्हा मारहाण केली
ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार ? अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली. ठाणे - कळव्यातील मनीषा नगर परिसरात ही घटना घडली. एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते, त्यावेळी ही घटना घडली. मात्र, हा कार्यक्रम फसवा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून बाहेर आल्यानंतर पोळ यांना काही महिलांनी पुन्हा मारहाण केली. शाई फेकून पोळ यांच्यावर कोणी हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यामुळे ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचे बोलले जात आहे.

सर्व महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी अंगावर धावत जाऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून अयोध्या पोळ यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in