गद्दार आमदारांसाठी 'मातोश्री'चे दरवाजे उघडणार? तातडीच्या बैठकीत चर्चा

शिंदेंचे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या फळीतील बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना पुन्हा 'मातोश्री' चे दरवाजे उघडायचे का, याबाबत रविवारी 'मातोश्री' वर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
उद्धव ठाकरे यांचे संग्रहित छायाचित्र
उद्धव ठाकरे यांचे संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, त्यावेळी ४० आमदार एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेले. मात्र त्यापैकी काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत.

शिंदेंचे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या फळीतील बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना पुन्हा 'मातोश्री' चे दरवाजे उघडायचे का, याबाबत रविवारी 'मातोश्री' वर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात जाहीरसभा घेणे, निवडणूक नियोजन याबाबतही चर्चा झाल्याचे शिवसेनेतील एका बड्या नेत्याने सांगितले.

जागावाटपावरुन मविआत मतभेद आहेत. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मविआच्या बैठका सुरू आहेत. मात्र बैठकीत विदर्भासह काही जागांवर मतभेद कायम असल्याने काँग्रेस आणि शिवसेनेत तू तू-मै मै सुरू आहे. मात्र शनिवारी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांनी बोलताना म्हणाले, मविआची प्रकृती स्थिर आहे.

मात्र, रविवारी अचानक उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार, पदाधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेतील संपर्कात असलेल्या आमदारांना पुन्हा 'मातोश्री' चे दरवाजे उघडायचे का? यावर चर्चा झाल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल परब, विनायक राऊत आदी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in