संभाजीनगर : पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्ता गोर्डे, वैजापूर येथील वैद्यकीय व्यवसायिक डॉ. राजू डोंगरे व संभाजी नगर येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. पूर्वाश्रमीचे दत्ता गोर्डे यांनी घरवापसी केल्यामुळे अजित पवार गटाला पैठण मध्ये मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचे आक्रमक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख संपूर्ण तालुक्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी ते शिवसेनेतच होते. गोर्डे यांच्यासोबत सुरेश दुबाळे माजी सभापती, वि.आर.थोटे प्राध्यापक, माजी उपाध्यक्ष आपासाहेब गायकवाड, प्रवीण शिंदे आदी जणांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संपर्कप्रमुख डॉ. विनोद घोसाळकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजू राठोड,माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर, उपजिल्हाप्रमुख संजय निकम, अविनाश पाटील गलांडे, अंकुश रंधे, अशोक शिंदे, अनंत भालेकर, बद्री नारायण भुमरे, शुभम पिवळ, मनोज पेरे उपस्थित होते.