संतोष बांगर यांच्या बंडखोरीवर शिवसेना करणार कारवाई

बांगर यांच्या बंडाचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही, असे प्रत्युत्तर शिवसैनिकांनी दिले आहे
संतोष बांगर यांच्या बंडखोरीवर शिवसेना करणार कारवाई
ANI

बहुमत चाचणीच्या एक दिवस आधीपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत असलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर फ्लोर टेस्टच्या दिवशी मात्र शिंदे गटामध्ये सामील झाले. एकनाथ शिंदे गटाने जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा हेच संतोष बांगर सर्व जनतेसमोर आणि कॅमेरासमोर रडत स्वतःला सच्चा शिवसैनिक म्हणून सिद्ध करू पाहत होते. अवघ्या 24 तासात शिंदे सैनिक झालेल्या संतोष बांगर यांना शिवसेना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

हिंगोलीत शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बांगर यांच्या बंडाचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही, असे प्रत्युत्तर शिवसैनिकांनी दिले आहे. बांगर यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवून नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. बांगर यांच्या बंडखोरीनंतर हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी हिंगोली येथे शिवसैनिकांची बैठक घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट शिवसैनिकांशी फोनवरून संवाद साधला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in