
सिंधुदुर्ग : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या काही महिन्यांतच कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.
आता त्याच ठिकाणी नवीन भव्य पुतळा उभारण्यात आला असून त्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ मे रोजी होणार आहे. फडणवीस हे ११ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शिवाजी महाराजांच्या या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार आहे.