शिवाजी विद्यापीठाला मिळणार ३५ कोटी निधी: अजित पवार यांची पुण्यात ग्वाही; पालकमंत्री मुश्रीफ यांची आग्रही मागणी

पवार यांनी तातडीने वित्त विभागाच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या आणि येत्या अर्थसंकल्पात हा निधी समाविष्ट करण्याचेही सांगितले
शिवाजी विद्यापीठाला मिळणार ३५ कोटी निधी: अजित पवार यांची पुण्यात ग्वाही; पालकमंत्री मुश्रीफ यांची आग्रही मागणी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला लवकरच ३५ कोटी रुपये निधी मिळणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आग्रही मागणीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही ग्वाही दिली.

पुणे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे विभागातील पाच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समित्यांची राज्यस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे ही मागणी केली. पवार यांनी तातडीने वित्त विभागाच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या आणि येत्या अर्थसंकल्पात हा निधी समाविष्ट करण्याचेही सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी, सन २०१४-१५ या विद्यापीठाच्या शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांकरीता तत्कालीन उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी ५० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तो निधी मंजुरीही झाला आहे. त्यानंतर कोविडसह अन्य कारणांमुळे निधी मिळण्यास विलंब झाला. मंजूर ५० कोटींमधील १६ कोटी, दहा लाख रुपये आत्तापर्यंत मिळालेले आहेत. उर्वरित निधी लवकर मिळावा अशी मागणी वैद्यकीय शिक्षण विशेष काय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. याबाबतची मागणी आणि पाठपुरावा केडीसीसी बँकेचे संचालक व शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे माजी सदस्य प्रताप उर्फ भैया माने, शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे माजी सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी केला होता.

या उपक्रमांना मिळणार निधी

या निधीमधून स्कूल आपण नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या मुख्य इमारतीसह मुलांचे वस्तीगृह, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर अँड म्युझियम कॉम्प्लेक्स, कन्वेंशन सेंटर, युवा विकास केंद्र, गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाऊस, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन ही कामे होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in