Ratnagiri : "रामदास कदमांच्या मुलाला..."; खेडमध्ये बोलताना काय म्हणाले भास्कर जाधव?

रत्नागिरीमधील (Ratnagiri) खेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी केली भाजप-शिंदे गटावर टीका
Ratnagiri : "रामदास कदमांच्या मुलाला..."; खेडमध्ये बोलताना काय म्हणाले भास्कर जाधव?

आज रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यामध्ये सुरुवातील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपसह शिंदे गट आणि खासकरून रामदास कदम यांच्यावर टीका केली. तसेच, रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदमला मला पराभूत करायचे आहे, असे म्हणत त्यांना इशारा दिला. दरम्यान, शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेतली.

या सभेमध्ये भास्कर जाधव म्हणाले की, "रामदास कदमांनी मतदार संघात काहीच विकास केला नाही. रामदास कदम म्हणजे झपाटलेला चित्रपटातील तात्या विंचू आहेत. कोकणातील नैसर्गिक संकटात रामदास कदम फिरकलेसुद्धा नाहीत. कोरोना संकटात एकाही गावात गेले नाहीत. ५ वर्ष मंत्री होता, मतदारसंघात काहीही काम केले नाही. केवळ मुलासाठी दापोलीत निधी दिला," असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे आज आघात झाल्यानंतर पहिल्यांदाच बाहेर पडले. यानंतर पहिल्यांदा ते कोकणात आले असून झालेल्या आघाताचा बदला घ्यायाचा असेल, तर उद्धव ठाकरेंचा विश्वासदेखील माझ्या कोकणावरच दिसतो आहे. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. शिवसेना प्रमुखांनी आमचा सन्मान केला. आम्हाला प्रतिष्ठा, पद आणि सत्ता मिळवून दिली. काही लोकांनी शिवसेनेचा विचार मातीत मिळवायचा विचार केला असला, तरी शिमग्यादिवशी अशा प्रकारची गद्दार प्रवृत्ती होळीच्या सणात जाळून पुन्हा शिवसेनेचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास पक्ष प्रमुखांना आम्ही देतो." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

logo
marathi.freepressjournal.in