मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर यांचा उपनेतेपदाचा राजीनामा

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेना शिंदे गटात नाराजी उफाळून आली आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
आ. नरेंद्र भोंडेकर, एकनाथ शिंदे
(डावीकडून)
आ. नरेंद्र भोंडेकर, एकनाथ शिंदे (डावीकडून)
Published on

नागपूर : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेना शिंदे गटात नाराजी उफाळून आली आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज होत भोंडेकर यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच महायुतीतील शिवसेना पक्षात नाराजी नाट्य उफाळून आले. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

आरपीआयला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही. त्यामुळे आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आठवले म्हणाले, जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत माझे बोलणे झाले होते. तेव्हा शहा यांनी फडणवीस यांच्यासोबत बोलण्यास सांगितले होते.

logo
marathi.freepressjournal.in