Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? आज सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा पुढे

निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ ला शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं होतं.
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? आज सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा पुढे

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्याने शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार होती. निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ ला शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं होतं. यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही.. १८ सप्टेंबरला या या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ३ आठवड्यांनी सुनावणी घेऊ असं सांगितलं होतं.

दरम्यान आज देखील या प्रकरणाची सुनावणी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आज होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आज पूर्ण दिवसभर दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी पार पडणार असल्याने ही सुनावणी होणार नाही. दरम्यान, आता ही सुनावणी कधी होते हे पाहवं लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in