Shivsena: ई-मेलवरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने ; व्हिपचा ई-मेल मिळाला नसल्याचा शिंदे गटाचा दावा

या प्रकरणात शिवसेनेच्या एकूण ३४ याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे.
Shivsena: ई-मेलवरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने ; व्हिपचा ई-मेल मिळाला नसल्याचा शिंदे गटाचा दावा

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या. सुनावणीवेळी व्हिपच्या मुद्यावरुन शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं आहे. या वेळी दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई-मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांना केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केलं नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं. शिवसेनेच्या आमदार आपात्रता प्रकरणावरुन विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या एकूण ३४ याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे.

आज सुरु झालेल्या या सुनावणीला ठाकरे गटचाने अनिल देसाई, सुनिला प्रभू आणि अजय चौधरी हे उपस्थित होते. तर शिंदे गटाचे कुणीही यावेळी उपस्थित नव्हतं. यावेळी दोन्ही गटांमध्ये ई-मेलच्या व्हिपवरुन जोरदार घमासान पार पडलं.

शिवसेनेच्या १६ आमदारांना ई-मेलच्या माध्यमातून व्हिप बजावण्यात आला असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. त्या संबंधित त्यांनी पुरावे देखील सादर केले. पण ज्यावर व्हिप पाठवण्यात आले ते ईमेल आपले नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला. त्यामुळे आपल्याला व्हिप मिळालाचं नसल्याने त्याचा उल्लंघन केलं असं होतं नाही असं शिंदे गटाच्या वतीनं सांगण्यात आलं.

जर आम्ही व्हिप पाठवलेला ई-मेल चुकीचा आहे तर बरोबर कुठला आहे. ते त्यांनी सांगावं. आयटी कायद्यानुसार ईमेल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांना स्पेशन ईमेल आयडी मिळाला आहे का? महेश शिंदे यांनी maheshshinde0003 असा मेल आयडी दिला आहे. का कुठला आयडी आहे.

तुम्ही म्हणता ईमेल दिला आहे पण ते म्हणतात तसं चुकीच्या ईमेलवर जर दिला असेल तर त्याला उत्तर काय असा सवाल राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना केला. यावर ठाकरे गटाच्या वकिलांकडून आम्ही पाठवलेला ईमेल चुकीचा आहे तर बरोबर कुठला आहे हे त्यांनी सांगावं असा युक्तीवाद केला गेला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in