शिवशाही बसला भररस्त्यात लागली आग ; सर्व प्रवासी सुखरूप बाहेर

यवतमाळ सोडल्यापासून ही बस वारंवार गरम होत होती. पण अशा अवस्थेत ती पुण्यात आली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप
शिवशाही बसला भररस्त्यात लागली आग ; सर्व प्रवासी सुखरूप बाहेर

पुण्यात आज (मंगळवारी) आणखी एक आगीची घटना घडली आहे. शहरातील शास्त्रीनगर चौकात शिवशाही बसला आग लागली. या आधी पुण्यात पहाटे एका हॉटेलला आग लागली होती. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. या बसला रस्त्यावर आग लागल्याने एकच खळबळ उडाली आणि बघ्यांची गर्दी झाली. या आगीत बसचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

शास्त्रीनगर हा पुण्यातील अत्यंत वर्दळीचा परिसर असून या भागात शिवशाही बसला रस्त्यावर आग लागली. ही शिवशाही बस क्रमांक MH 06 D W 0317 यवतमाळ-औरंगाबाद-पुणे दरम्यान प्रवास करत होती. आज सकाळी येरवड्यातील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटलजवळ बस आली असता अचानक पेट घेतला. ही बस शिवाजीनगर बस डेपोकडे जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ सोडल्यापासून ही बस वारंवार गरम होत होती. पण अशा अवस्थेत ती पुण्यात आली. सुदैवाने सर्व प्रवासी खराडी येथे उतरले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in