आंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चार भावंडांचा शॉक लागून मृत्यू

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथे ही घटना घडली
आंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चार भावंडांचा शॉक लागून मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चार मुलांचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथे ही घटना घडली. अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे आणि विराज अजित बर्डे या चौघा भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. बर्डे यांच्या वस्तीजवळच छोटेसे तळे असून त्यावरून वीजवाहक तारा गेल्या आहेत.पावसामुळे तारा तुटून तळ्यात पडलेल्या मुलांना दिसल्या नाहीत चौघेही सरळ पाण्यात उतरल्याने त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनी विरुद्ध संता व्यक्त केला आहे घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्राचार्य करण्यात आले त्यानंतर मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि माहिती पोलिसांना देण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in