धक्कादायक! मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

या तरुणाने स्वत:वर धारदार ब्लेडने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
धक्कादायक! मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या  कार्यालयाबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मदत मागण्यासाठी आलेल्या एका तरुणाने मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्याबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. साताऱ्याहून आलेल्या तरुणाने २ ऑगस्ट रोजी मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अचाकन घडलेल्या या प्रकारामुळे मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली. या तरुणाने स्वत:वर धारदार ब्लेडने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केलं.

सुरेश जगताप असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव असून त्याच्यावर आता उपचार सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण कर्जबाजारी पणाला कंटाळून मदत मागण्यासाठी मंत्रालयात आला होता. यावेळी मंत्रालयात आपल्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचा आरोप करत त्याने मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरचं आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना तात्काळ धाव घेत तरुणाला रुग्णालयता दाखल केलं.

याप्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिसांनी चौकशी सुरु केली असून सुरेश जगताप यांनी मंत्रालयात कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर स्वत:च्या डाव्या मनगटावर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तात्काळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत या तरुणाला डीटी रुग्णालयात दाखल केलं. या तरुणाला गंभीर जखमा झाल्याचं सांगितलं जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in