धक्कादायक! कानात हेडफोन घालून बस चालवताना मोबाईवर पाहत होता सिनेमा ; समृद्धी महामार्गावर व्हिडिओ व्हायरल

या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
धक्कादायक! कानात हेडफोन घालून बस चालवताना मोबाईवर पाहत होता सिनेमा ; समृद्धी महामार्गावर व्हिडिओ व्हायरल

समृत्ती महामार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातात शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या महामार्गावर अपघाताचे प्रमाण नेहमीच वाढते राहिले आहे. त्याची आकडेवारीही भयावह आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर आमि त्यावरील अपाघातचे प्रमाण हा नेहमी चिंतेचा विषया राहिला आहे. त्याचं आता एका व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाऊस सर्वांना धक्काचं बसला आहे.

या व्हायरल व्हिडिओत एक बस चालक कानात हेडफोन घातून मोबाईलवरच चित्रपट पाहतो आहे. बस सातत्याने लेन बदलते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनसेच्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, समृद्धी महामार्गच नाही तर राज्यात कुठल्याही महामार्गावर बेदरकार वाहनचालकांवर कडक कारवाई व्हायला हवी. समृद्दी महामार्गावर अपघातांची जी मालिका सुरु आहे. त्यावरुन हे असे चालक किती धोकादायक आहेत याचा अंदाज येतो.

या अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी तसंच असं काही आढळ्यास लोकांना तात्काळ कारवाईसाठी एक विशेष यंत्रणा उभी करावी ही विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्ग हा सुरुवातीपासून वादग्रस्त महामार्ग राहिला असून या महामार्गावर झापलेल्या अपघाता अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. याता या चालकावर काही कारवाई होते का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in