Pooja Khedkar : पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस; २ ऑगस्टपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश

खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांनी येत्या २ ऑगस्टपर्यंत लेखी खुलासा करावा, असे आदेश खेडकर यांना देण्यात आले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडून (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांनी येत्या २ ऑगस्टपर्यंत लेखी खुलासा करावा, असे आदेश खेडकर यांना देण्यात आले आहेत.

खेडकर यांची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. या कालावधीत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला. खेडकर यांनी वाशीम पोलिसांकडे तक्रार दिली होती. हे प्रकरण पुण्यात घडल्याने वाशीम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे चौकशी सोपविली. खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. पुणे पोलिसांनी तीनदा समन्स बजावूनही खेडकर हजर झाल्या नाहीत.

खेडकर यांच्यावर असलेल्या आरोपाबाबत लेखी खुलासा करण्यात यावा, असे आदेश केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in