पत्रकार गौरी लंकेश हत्येतील आरोपीला पदावरून हटविले; शिंदे गटाची कारवाई

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केल्यानंतर जालना निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
श्रीकांत पांगारकर (डावीकडे)
श्रीकांत पांगारकर (डावीकडे)
Published on

मुंबई : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केल्यानंतर जालना निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी या नियुक्तीला अचानक स्थगिती देत पांगरकर यांना पदावरून हटवले.

पत्रकार लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ मध्ये बंगळुरु येथे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात आरोपी असलेले पांगरकर यांनी शुक्रवारी शिंदे यांच्या शिवसेनेत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

नगरसेवक असलेले पांगरकर हे शिवसेना एकत्र असताना शिवसैनिक होते. मात्र निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी २०११ मध्ये हिंदु जनजागृती समितीमध्ये प्रवेश केला होता. पांगरकर पुन्हा शिवसेनेत दाखल झाले असल्याचे सांगत त्यांची जालना निवडणूक प्रचार प्रमुखपदी नियुक्त केले असल्याची घोषणा खोतकर यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावेळी केली होती. शिवसेनेने रविवारी एका निवेदनाद्वारे, पांगरकर यांची नियुक्ती स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

logo
marathi.freepressjournal.in